उस्मानाबाद / प्रतिनिधी-

सार्थक सचिन अंधारे (इ.6वी) या विद्यार्थ्यांची उस्मानाबाद जिल्ह्यातून सैनिक स्कूल सातारा या ठिकाणी पुढिल शिक्षणासाठी निवड झाली आहे . खरंच आपल्या जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे कारण या परिक्षेसाठी महाराष्ट्रातून फक्त 60 विद्यार्थ्याची निवड केली जाते. यासाठी एक स्पर्धा परिक्षा घेतली जाते . या परिक्षेसाठी हजारो विद्यार्थी बसतात . परंतु मेरिटनुसार निवड केली जाते त्यात आपल्या जिल्ह्यातील एका मुलाची निवड झाली . हे कौतुकास्पद आहे . त्यामुळे आ  कैलास पाटील यांनी  त्याच्या घरी जाऊन सार्थक व त्याच्या कुटुंबियाचे कौतुक करून त्याचा  सत्कार केला . 

आपल्या जिल्ह्यातील मुलांनी यातून प्रेरणा घेवून असेच यश मिळवून जिल्ह्याचे नाव करावे असेही आ कैलास पाटील यांनी सांगितले व सार्थकला पुढिल शैक्षणिक वाटचालीस  शुभेच्छा दिल्या .

  या सत्कारप्रसंगी आ कैलास पाटील सोबत गटनेते तथा नगरसेवक सोमनाथ गुरव,नगर सेवक बाळासाहेब काकडे , माजी शहरप्रमुख प्रविण भैय्या कोकाटे ,  युवासेना उपजिल्हा प्रमुख निलेश शिंदे , श्री संतोष वाडेकर , श्री .हणमंत देवकते , श्री . राजाभाऊ क्षीरसागर सर , श्री विकास चव्हाण सर , श्री सचिन अंधारे सर , श्री चव्हाण सर  व मित्र मंडळीची उपस्थिती होती .

 
Top