उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिन समारोह निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा कार्यालय येथे जिल्हाअध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत, ज्येष्ठ नेते जीवनरावजी गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. प्रसंगी जिल्हा सरचिटणीस नितीन बागल यांच्यासोबत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी “आम्ही भारताचे नागरिक 75 व्या स्वातंत्र्यदिनी शपथ घेतो की आम्ही स्वातंत्र्य, लोकशाही, सामाजिक समता आणि आपल्या राज्यघटनेशी वचनबद्ध असून कृतिशील राहू” अशी शपथ ग्रहण केली.

 यावेळी संजय पाटील दुधगावकर जिल्हा कार्याध्यक्ष, डॉ.संदीप तांबारे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी व्यसनमुक्ती सेल, मसूद शेख प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्यक सेल, संपत डोके माजी नगराध्यक्ष उस्मानाबाद,उस्मानाबाद तालुका अध्यक्ष श्याम घोगरे, डॉ.प्रतापसिंह पाटील, नंदकुमार गवारे, प्रा.तुषार वाघमारे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख, कादर खान, गौस तांबोळी ,वाजिद पठाण जिल्हा उपाध्यक्ष, डॉक्टर अविनाश तांबारे डॉक्टर सेल,उस्मानाबाद महिला अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष अप्सरा पठाण,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष खलील पठाण,मसूद काजी जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्यांक, उपाध्यक्ष प्रशांत फंड, विराट पाटील,दत्तात्रय पवार तालुका संघटक,बाळासाहेब खांडेकर तालुका संघटक, हाजी खय्यामोद्दिन, श्रीहरी गपाट, उस्मानाबाद शहराध्यक्ष आयाज शेख, शहर कार्याध्यक्ष सचिन तावडे, शहर उपाध्यक्ष मनोज मुदगल, अनिकेत पाटील, नगरसेवक खलिफा कुरेशी, इस्माईल शेख ,बाबा मुजावर, युवा नेते मृत्युंजय बनसोडे, अन्वर शेख,फंड विशाल, इक्बाल शेख शहर सहकोषाध्यक्ष, इलियास पिरजादे, अमोल सुरवसे, विद्यार्थी शहराध्यक्ष सौरभ देशमुख, पृथ्वीराज मुळे उपाध्यक्ष शहर,अनिल जाधव, सतीश घोडेराव माजी सभापती प. स, अनुराग गाडेकर, नारायण तूरूप सा. न्या वी, युवक तालुकाध्यक्ष अमरसिंह देशमुख, महावीर हुबाले, अभिजीत व्हटकर शहर प्रवक्ता, सुधीर पडवळ, राजकुमार पवार, एस के इनामदार, सुनील शेंडगे, नितीन चव्हाण, आदम जमादार, अमीन जमादार, बिलाल कोतवाल, आजीम जमादार, लतीफ पटेल सोशल मीडिया, इस्माईल काजी, सावळे विवेकानंद, प्रशांत लादुळकर, आश्रुबा गाढवे, सद्दाम शेख, मझहर शेरिकर, बशीर शेख, शेख रसूल, अहमद शेख, आसिफ अन्सारी, जावेद शेख, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

 
Top