तुळजापूर / प्रतिनिधी- 

जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामातील हमालांना नोव्हेंबर पासुन मजुरी दिली जात नसल्याने जिल्हयातील धान्य गोदामातील हमालांनी २२ मार्च पासुन कामबंद आंदोलन सुरु केले.

या बाबतीत जिल्हाअधिकारी व जिल्हापुरवठा अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटल आहे कि, या प्रकरणी संघटनेने वारोंवारविनंती केली माञ कंञाटदार पैसे भरत नाहीत व जिल्हा प्रशाषण ही काही कारवाई करीत नाही या सा-या परिस्थिती जिल्ह्यातील गोदाम हमालांची परिस्थिती बिकट बनली आहे. 

सध्या गोदामा हमालांना ऐक क्विंटल पोत्यासाठी बावीस रुपये हमाली दिली जाते यात  ट्रक मधुन पोत खाली उतरणे त्याचे वजण करणे व थप्या लावणे, कोरोना काळ त्यात गेली चार महिन्या पासुन हमाली दिली न गेल्याने याचा उधा-या वाढल्या असुन दुकानदार यांना माल देईनास झाला आहे.त्यामुळे लवकर हमाली दिली नाहीतर गोदाम हमाल कुंटुंबाना उपासमारीस सामोरे जावे लागणार आहे.तरी नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या चार महिन्याची हमाली व त्यावरील लेव्ही 22 मार्च 2021 पर्यत पाठवावी अशी विनंती केली होती.

 
Top