उस्मानाबाद/ प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना नियम, 2020” प्रसिद्ध केले करोना विषाणुमुळे (COVID-19) उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे. 

 जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे, कौस्तुभ दिवेगावकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये दिलेल्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात कन्टेन्मेंट झोन (Containment Zone) च्या बाहेरील क्षेत्रात ठाराविक उपक्रम/बाबी पुन्हा चालू करणेस या आदेशान्वये परवानगी देत आहे. तसेच लॉकडाऊन कालावधीत जिल्ह्यात  कोविड-19 च्या व्यवस्थापनाच्या राष्ट्रीय सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील असे आदेश जारी  केले आहेत.  

 दिनांक 31 ऑक्टोबर 2020 पर्यंतच्या लॉकडाऊनचे कालावधीत संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात गृह विलगीकरण (Home Quarantine) च्या नियमांचे उल्लंघन करणा-या व्यक्तीविरोधात दंडात्मक कारवाई करणेबाबतचे आदेश संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात पूर्वीप्रमाणेच लागू राहतील. आदेशान्वये नमूद केलेल्या गैरकृत्यांबाबत दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश संपूर्ण जिल्ह्यात पूर्वीप्रमाणेच लागू राहतील. या आदेशा नमूद केलेल्या ज्या बाबींना चालू ठेवण्यास वेळोवेळी परवानगी देण्यात आलेली आहे त्या सर्व बाबी 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत पूर्वीप्रमाणे चालू ठेवण्यास परवानगी राहील. या कार्यालयाने यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश या आदेशासोबत दि. 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत लागू राहतील.

 या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60, महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम 2020 चे नियम 11, साथरोग अधिनियम 1897 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 व इतर लागू होणा-या कायदेशीर तरतुदींनुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहील. असेही आदेशात नमुद केले आहे.

 
Top