उस्मानाबाद / प्रतिनिधी-
मागील काही दिवसापूर्वी राज्यमंत्री बच्चु कडू यानी केलेल्या सूचने प्रमाणे प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्या नेतृत्वाखाली मा. जिल्हाधिकारी यानां निवेदन देण्यात आले या निवेदनात कोरोनामुळे पालकाकडे विद्यार्थ्यांच्यां प्रवेशाकरिता पैसा राहिलेला नाही त्यामुळे शिक्षण संस्थेने यावेळी पालकाना फीस व पुस्तके खरेदी करण्याकरीता  तगादा लावल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करणार असल्याचे सांगितले आहे तसेच हा इशारा न समाजणाऱ्या संस्थेना सज्जड दम  या पत्राच्या माध्यमातून देण्यात आला.
 मागील काही दिवसांपासून संघटनेकडे  भरपूर तक्रारी उपलब्ध झाल्या असून शिक्षक अधिकारी यानी लवकरात यावर संस्थेना नोटिस बजावुन त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी तसे नाही झाल्यास शिक्षण अधिकारी यांची तक्रार करण्यात येईल व त्यांच्या विरोधात संघटनेच्या वतीने कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा निवेदनामार्फत देण्यात आला,
 शिक्षण संस्थच्या फी विषयक व पुस्तक खरेदी साठि लावण्यात आलेल्या तगद्यामुळे पालक मेटाकुटिला आलेला आहे यासंदर्भात पालकानी काही तक्रारी असतील तर संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्याकडे नोंद्वाव्यात असे आव्हान संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे, सदरील निवेदनावर जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्यासह नारायण सालुंके ,काकासाहेब कांबळे,बाळासाहेब कसबे, जमीर शेख,बाळासाहेब पाटिल ,दादासाहेब अकोसकर यांच्या स्वाक्षरी आहेत.
 
Top