उमरगा/प्रतिनिधी
खाजगी बस व कंटेनरची समोरासमोर धडक बसून झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनाच्या चालकासह जवळपास सत्तावीस जण जखमी झाल्याची घटना सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गा वरील दाळिंब (ता. उमरगा) गावाजवळ गुरुवार, दि. 4 रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली.
याबाबतची प्राप्त माहिती अशी की, तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर दाळिंब गावाजवळ असलेल्या नवजीवन प्रेरणा केंद्रा समोर गुरुवारी मध्यरात्री दिड ते दोनच्या सुमारास सोलापूरहून हैद्राबादच्या दिशेने निघालेला कंटेनर (क्रमांक डब्ल्यू बी 11 डी 4971) व हैद्राबादहून शिर्डीकडे निघालेली खाजगी शयनयान बस (क्रमांक पी वाय 05 ए 2277) ची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात बस चालक अजीम अमर सय्यद वय 35 वर्षे रा. येवला, नाशीक, कंटेनर चालक अनिलकुमार यादव वय 35 वर्षे रा. बिहार, स्वाती मादीनेनी (29), कुलशेखर कोणकी (33), बी राम किशोर (48), बी सुधाराणी (40), एम विजयकुमार (40), जी किशोर(39), अश्विनी अंबाटी(25), एम विजया (30), शेख बेगम(40), शेख रहेमान (26),शेख महंमहदशा (30), वेंकटा साई किरण (22), श्रीशैल गौड (50), स्वाती किरण (22) एम जगदीप (28), ब्रिजेश यादव (22), बबलू बारबार (35), किरण अक्की लांडेश्वरी (20), लिखिता चेजरला (20), श्रीदेवी चेजरला (47), सुब्बाराव पटला (53) सर्व रा हैदराबाद, दत्तम्मा (45), अनिता हडपद (26) दोघीही रा. बेमल खेडा कर्नाटक देवानंद जाधव (35) रा.बिहार यांच्या सह दोन्ही वाहनातील मिलून सत्तावीस जण जखमी झाले आहेत. उर्वरीत जखमींची नावे समजू शकली नाहीत. दरम्यान अपघाता नंतर जखमींना 108 रूग्नवाहिके सह खाजगी वाहनातून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील गंभीर चार जखमीना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे. दोन्ही वाहनाच्या धडकेमध्ये अडकलेल्या  बस चालकाला जेेेसीबी दोन्ही वाहने हटवून एक तासाने बाहेर काढण्यात यश आले.
 
Top