धाराशिव (प्रतिनिधी)- मुलीचे कोयत्याचा धाक दाखवून मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीस अंबाजोगाईमध्ये पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अभिजित उर्फ तन्या अर्जुन नवाट, रा. कोठाळवाडी, किरण भागवत तुपारे, रा. बोरगाव ता. कळंब, अजय रामकिसन माने, रा. परळी रोड बायपास कळंब ता. कळंब जि. धाराशिव इतर एक इसम यांनी दि. 06.11.2026 रोजी दुपारी 1 वाजता बोर्डापासुन ते दगडवाडी शिवारातील खडी केंद्रापर्यंत अंबाजोगाई जिल्हा बीड येथुन फिर्यादी रागिणी रमेश कानगे, वय 23 वर्षे, रा. बोर्डा ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी त्याची ईर्डीगा गाडी जिचा क्र. एमएच 20 डी.व्ही 0357 याचे मध्ये संगणमत करुन फिर्यादीचे घरात घुसून जातीवाचक शिवीगाळ करुन, कोयत्याचा धाक दाखवून, जिवे ठार मारण्याची धमकी देवून वाहनात बसवून घेवून गेले. अशी फिर्यादी रागिणी कानगे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पोलिस ठाणे कळंब येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे तपासा दरम्यान पोलीस निरीक्षक ठाणे कळंब येथील पथक लागलीच अपहरित मुलीचा शोध घेणे कमी रवाना झाले. सदर पथक पाठलाग करत असताना पोलीस निरीक्षक शकील शेख यांनी तांत्रिक बाब लक्षात घेऊन सदर गाडी मध्ये असलेले जीपीएसची माहिती घेऊन सदर जीपीएसचे लोकेशन वारंवार पथकास दिल्याने अंबाजोगाई येथील एक खदानी जवळ त्यांच्या गाडीजवळ पथक पोहचले. सदर गाडीमध्ये आरोपी हा अपहरित मुलीला मारण्याचा प्रयत्न करत असताना पोलीस ठाणे कळंब येथील पोलीस हवालदार गणेश वाघमोडे यांनी अत्यंत शीताफिने जीवाची परवा न करता सदर आरोपीवर झडप घालून त्याचा ताबा घेतला.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक शकील शेख, पोलीस उपनिरीक्षक सिराज पठाण, पोलीस हवालदार वाघमोडे, पोलीस नाईक भाऊसाहेब पोळ, पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर कदम, पोलीस कॉन्स्टेबलआसाराम खाडे, पोलीस कॉन्स्टेबल अनिल भोसले यांनी केली.