धाराशिव (प्रतिनिधी)-  आषाढ महिन्यातील शुध्द पक्षामध्ये येणारी आषाढी एकादशी या एकादशी निमीत्त महाराष्ट्रात  पंढरपुरची वारी ही परंपरा खुप प्रसिध्द असुन भक्त संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर व संत गजानन महाराज यांच्या पालख्यामध्ये पंढरपूरला लाखो वारकरी दुरदुरवुरन चालत विठोबाच्या दर्शनासाठी जातात. आज दि.15 जुलै रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव येथे  पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांचे मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशी निमीत्त पंढरपुर येथे जाणारी श्री. संत गजानन महाराज यांचे दीडींतील वारकरी यांचे सेवेत पोलीस विभागातील मोटर परिवहन विभागाचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांचे मार्फतीने स्वखर्चाने केळी व पाणी बॉटल वाटप करण्यात आले.

 
Top