भूम (प्रतिनिधी)-  शहरांमध्ये ठिकठिकाणी कचऱ्यांचे मोठ्या प्रमाणात ढीग साचलेले आहेत. त्यामुळे शहरवासीयची मोठी गैरसोय होत आहे. या ठेकेदाराची गेल्या आठ महिन्याचे बिल देणे बाकी आहे. यावर तोडगा काढण्यासाठी नगराध्यक्ष या नात्याने संयोगिता गाढवे यांनी मुख्याधिकारी शैला डाके यांच्याशी चर्चा केली. त्यांनी संबंधित ठेकेदाराला त्यांचे नगरपालिकेकडे असणारे देयक सात दिवसात देण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे सोमवारी पुन्हा कचऱ्याचे संकलन चालू होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष संयोगिता गाढवे यांनी पत्रकार परिषदेत मध्ये दिली. 

यावेळी गटनेते सुरज गाढवे व नगरसेवक अभिजीत शेटे हे उपस्थित होते. यावेळी संयोगिता गाढवे यांनी सांगितले की, भूम नगरपालिकेकडे 20 कर्मचारी आहेत. त्यापैकी 4 साफसफाईला व 16 पाणी पुरवठ्यास आहेत. त्यामुळे चार कर्मचाऱ्यांवर भूम शहराची पूर्णपणे साफसफाई होऊ शकत नाही. भूम शहरामध्ये आमची सत्ता असल्यापासून कचरा व्यवस्थापनाची शहरवासीयांना आम्ही सवय लावलेली आहे. त्यामुळे यापुढील काळात ही शहरवासीयांची गैरसोय होऊ दिली जाणार नाही. सोमवार पासून कचरा संकलन सुरळीत होईल. कचरा व्यवस्थापनाच्या टेंडरची प्रक्रिया नाही झाली तर पुन्हा मुदतवाढ द्यावी लागणार आहे. संपूर्ण शहराची साफसफाई कर्मचारी व ठेकेदाराच्या माध्यमातून केली जात असतानाही स्वच्छता करण्याचा आव आणला.त्याप्रमाणे या बाबतीतही माझा प्रभाग माझी जबाबदारी पार पाडावी. असा टोला या पत्रकार परिषदेमध्ये नगराध्यक्ष गाढवे यांनी विरोधकांना लगावला. नगराध्यक्ष या नात्याने संपूर्ण शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी माझी आहे. विरोधकांनी कितीही विरोध केला तरी मी शहरवासीयांच्या हिताचीच भूमिका घेणार असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

 
Top