तुळजापूर (प्रतिनिधी) - श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये आज महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. तेंव्हापासून दरवर्षी 1 मे हा दिवस संपूर्ण राज्यभर ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा केला जातो.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान येथे तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताचे गायन केले. या प्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन चौधर, लेखाधिकारी संतोष भेंकी, सिद्धेश्वर इंतुले, नागेश शितोळे, प्रवीण अमृतराव, अनिल चव्हाण, रामेश्वर वाले, अनुप ढमाले, विक्रम कदम तसेच पोलिस कर्मचारी आणि श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
