धाराशिव (प्रतिनिधी)-  कर्जाच्या वाढत्या ओझ्याला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील आंबेवाडी येथे घडली. गोरोबा विष्णू गोडसे (वय 54) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोडसे यांच्यावर शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचा मोठा बोजा होता. उत्पन्नात घट, पिकांचे अपयश आणि आर्थिक अडचणी यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून चिंतेत होते. या नैराश्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

 
Top