धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील समर्थ नगर धाराशिव येथील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. सुधीर मुळे यांच्या दवाखान्यातील सेवकाला चोरीच्या गुन्ह्यामध्ये सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा व 30 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

सदर घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, डॉ सुधीर मुळे यांचे स्वतःचे समर्थ नगर येथे श्रेयस नावाचे बाल रुग्णालय आहे. त्या रुग्णालयात सेवक म्हणून काम करत असलेला मुळेवाडी येथील अरविंद रामकृष्ण वाघ हा रुग्णालयात काम करीत असताना दवाखान्यातील  ड्राव्हर मध्ये ठेवलेले पैसे अरविंद वाघ याने पैसे चोरी करीत असल्याचा संशय आल्याने डॉ मुळे यांनी रुग्णालयात सी सी टी व्ही  बसवला व नेहमीप्रमाणे अरविंद वाघ हा पैसे चोरून घेत असताना दि. 22/9/2011 रोजी सी सी टी व्ही मध्ये दिसून आला त्यावर  आरोपी अरविंद वाघ याने 22500/- रु चोरून घेतल्याचे साक्षीदारासमक्ष  कबूल केले. त्यानंतर फिर्यादी डॉ सुधीर मुळे यांनी धाराशिव न्यायालयात फिर्याद दाखल केली न्यायालयाने 156(3) ... प्रमाणे गुन्हा नोंद करण्याचे आदेश पारित केले आरोपी अरविंद वाघ याचे विरुद्ध शहर पोलीस स्टेशन धाराशिव येथे गुन्हा रजिस्टर नं. 8/11 कलम 381,411,414 सह 34 भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल झाला व गुन्ह्याचा तपास तपासिक अमलदार विष्णू यादवराव कुऱ्हाळे यांनी करून आरोपी विरुद्ध दोषारोपत्र  दाखल केले व सदरचा खटला मुख्य न्याय दंडाधिकारी धाराशिव यांच्या न्यायालयात चालला सदर  खटल्यात डॉ सुधीर मुळे सह एकूण 7 साक्षीदारांचे जवाब  नोंदविण्यात  आले न्यायालयाच्या समोर साक्षीदारांनी योग्य तो नोंदविलेल्या साक्षी व विशेष म्हणजे सी सी टी व्ही कॅमेऱ्यात आरोपी पैसे चोरी करीत असताना झालेला कैद इ. पुराव्यावरून   व फिर्यादी डॉ. सुधीर मुळे यांच्यातर्फे शासकीय अभियोकता व्ही एस शेवाळकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी अरविंद वाघ या श्रीमती अपर्णा एन नावंदर  मुख्य न्यायदंडाधिकारी धाराशिव यांनी दि.30/3/2026 रोजी आरोपी अरविंद वाघ यास दोशी धरून 6 महिने सश्रम कारावासाची शिक्षा व 30 रुपये चा दंड ठोठावण्यात आला व दंडाच्या रकमेपैकी रुपये 25 हजार फिर्यादी डॉ. सुधीर मुळे यांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश झाला.

 
Top