भुम (प्रतिनिधी)-  भूम तालुक्यातील ईट येथे रविवार दिनांक 26 रोजी महाराष्ट्र काझी सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष मोहम्मद शफी गुलाम नबी काझी यांनी ईट येथील जामा मस्जिदला भेट दिली.समाज बांधवांबरोबर  विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली. तसेच उपस्थित समाजबांधवासह गावातील नागरिकांच्या वतीने त्यांचा फेटा,शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार कराण्यात आला.  

काझी हे बीड येथे गरजु व गरीब लोकांना बिगर व्याजी कर्ज देणारी बँक ही चालवतात. याप्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक गफूर तांबोळी,अब्दुल्ला काझी, मोहम्मद हनीफ तांबोळी,फैसल काझी,इर्शाद काझी,मज्जिद काझी,इसाक तांबोळी,मौलाना अय्याज,समीयोदिन काझी, तस्लिम काझी,इसाक काझी, वाहिद काझी,पत्रकार सोमेश्वर स्वामी,संदिपान कोकाटे,शौकत तांबोळी,राजू तांबोळी,युनूस शेख,सरदार पठाण,कामिल काझी,मैनु पठाण यांच्या सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top