धाराशिव (प्रतिनिधी)-  अवकाळी पाऊस व गारपीटीच्या तडाक्यामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील स्थिती अतिशय गंभीर झाली असून रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, मका यांच्यासह कांदा, द्राक्ष, डाळिंब ,केळी, मोसंबी इत्यादी फळबागांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून आता सरकारने गारपीटने उद्ध्वस्त झालेल्या पिकांच्या पंचनाम्याचा फार्स न करता शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी जेष्ठ समाजवादी नेते ॲड रेवण भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.  

राज्यभरातील हजारो हेक्टरवरील पीक अवकाळी पाऊस व गारपिटीने उद्ध्वस्त झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. इराण युद्धामुळे शेतीसह सर्वच क्षेत्रांना  आधीच फटका बसला आहे ,त्यात आता अवकाळी पाऊस, गारपीट व उन्हाचा तडाका अशा दुहेरी नैसर्गिक आपत्तीची  भर पडली आहे. अतिवृष्टी किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे उध्वस्त झालेल्या पिकासाठी आता शासनाने कसल्याही अटी- शर्ती लागू न करता तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी ॲड भोसले यांनी केली आहे.

 
Top