धाराशिव (प्रतिनिधी)- सामाजिक न्याय,आर्थिक व सामाजिक संरक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे.त्यानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व वंचित-दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी तसेच समाजात व्यापक जनजागृती निर्माण व्हावी,या उद्देशाने दरवर्षी ८ ते १४ एप्रिल या कालावधीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येतो.

या पार्श्वभूमीवर ११ एप्रिल २०२६ रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.यासोबतच विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा तसेच ज्येष्ठांसाठी कार्य करणाऱ्या बिगर शासकीय संस्थांचा सत्कार व गौरवही करण्यात येणार आहे.

 
Top