धाराशिव (प्रतिनिधी)- रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या बारावी वाणिज्य शाखेचा विद्यार्थी स्वप्नील ताकमोगे याची नुकतीच भारतीय सैन्य दलात निवड झाली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जिद्द व चिकाटीच्या जोरावर सदर विद्यार्थ्याने बारावी वर्गात शिकत असतानाच सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. 

रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाने आजपर्यंत अनेक शैक्षणिक पिढ्यांच्या भवितव्याला प्रामाणिक आकार दिला आहे. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांनी प्रेरित झालेले असंख्य विद्यार्थी घडवण्याचं काम रामकृष्ण परमहंस  महाविद्यालय अविरतपणे करत आहे. शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असताना सुद्धा सातत्यपूर्ण प्रयत्न, प्रामाणिकता याच्या बळावर सदर विद्यार्थ्यांनी हे यश संपादित केले आहे. त्याच्या यशाबद्दल रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संदीप देशमुख यांच्या हस्ते या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्युनियर वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉ. अभय देशमाने व इतर गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top