परंडा (प्रतिनिधी)- तालुका व शहरातील दिव्यांगांचा 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सांगता समारोप कार्यक्रम परंडा येथील पंचायत समिती सभागृहामध्ये दि.11 डिसेंबर रोजी शेकडो दिव्यांग बांधवांच्या समवेत “सोहळा दिव्यांगाचा, सोहळा सन्मानाचा“ कार्यक्रम उत्साहामध्ये संपन्न.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उद्घाटक भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून उद्घाटन करण्यात आले.प्रमुख उपस्थिती परंडा तहसील कार्यालयाचे तहसीलदार निलेश काकडे, परंडा गटविकास अधिकारी मोहन राऊत, परंडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमोले,श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष तथा मराठा सेवा संघ अध्यक्ष गोरख मोरजकर दिव्यांगाचे आधारस्तंभ उद्योजक रामभाऊ पवार, शाहीर शरद नवले, छत्रपती शासन ग्रुप अध्यक्ष प्राणजित गवंडी, प्रहार जनशक्ती पक्ष तालुकाध्यक्ष आप्पासाहेब तरटे, धाराशिव जिल्हा नूतन अध्यक्ष विठ्ठल गायकवाड भाजपा सरचिटणीस विकास कुलकर्णी आदीसह व्यासपीठावरील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा चे पूजन करून करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटक अध्यक्ष सुजितसिंह ठाकूर यांनी दिव्यांग दिव्यांगा विषयी असणाऱ्या योजना केंद्र शासन, महाराष्ट्र शासन याबत माहिती दिली व दिव्यांगाच्या पाठीशी मी ठामपणे उभे आहे. येणाऱ्या अडचणी समस्या सोडवण्यासाठी मी व माझे कार्यकर्ते नेहमी दिव्यांगा सोबत आहोत असे आश्वासन यावेळी बोलताना दिले. नंतर तहसीलदार काकडे यांनी तहसीलमध्ये असणारी संजय गांधी योजना , रेशनकार्ड व इतर समस्या सोडवण्यासाठी मी नेहमी आपल्या समवेत असेल दिव्यांग व्यथा मला माहित आहेत माझ्या घरात एक दिव्यांग आहे यांचा अनुभव देखील सांगितला मी व माझे कर्मचारी अधिकारी आपल्या समस्या सोडवण्यासाठी उपलब्ध आहोत किंवा माझ्या दालनामध्ये येऊन आपले शंका प्रश्न मांडू शकतात असे बोलताना काकडे म्हणाले , पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी यांच्या विभागांतर्गत येणारा घरकुल दिव्यांग 5% निधी , सेस विभाग, तसेच इतर योजना या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने आयोजित केलेले कार्यक्रम उपक्रम या संदर्भातील अहवाल आपल्या प्रस्ताविकेतून तानाजी घोडके यांनी मांडला या कार्यक्रमांमध्ये दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली यामध्ये दिव्यांग उद्योग समूह जिल्हाध्यक्ष विठ्ठल गायकवाड महिला जिल्हाध्यक्ष उषा भास्कर पाटील परांडा नूतन तालुका अध्यक्ष तानाजी सांगडे परंडा शहराध्यक्ष गोरख देशमाने उपाध्यक्ष अशोक भराटे प्रसिद्धीप्रमुख संतोष कुलकर्णी परंडा तालुका सरचिटणीस रावसाहेब खरसडे आदी दिव्यांगांना निवडीचे पत्र देण्यात आले. या कार्यक्रमाला तालुक्यातील दिव्यांग उत्तम शिंदे, दादा माने, करीम शेख, अनंता सावंत, ज्योती कुलकर्णी, कौशल्या मोहिते, मीना डोरले, नितीन शिंदे, जावेद तांबोळी , मयुर शिंदे, समाधान पन्हाळे, जियाउद्दीन काझी, जीवन सावंत, नासिर शेख, रहीम शेख, अस्लम सय्यद, शहाणे ओंकार, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर शरद नवले यांनी केले हा कार्यक्रम परंडा पंचायत समिती सभागृह येथे मोठ्या उत्साहात दिव्यांग बांधवांच्या समवेत संपन्न झाला.
