तेर (प्रतिनिधी) धाराशिव तालुक्यातील तेर येथील विज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयांतर्गत विविध 4 ठिकाणी 24 मेगॅ वॅट चा सौर ऊर्जा प्रकल्प विज वितरण कंपनीच्या जागेवर कार्यान्वित करण्यात आला आहे तर 2 ठिकाणी 9 मेगॅवॅट सौर ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहे अशी माहिती उपकार्यकारी अभियंता अमरनाथ स्वामी यांनी दिली.

ढोकी येथील 33/11केव्ही उपकेंद्र येथे 7 मेगॅवॅट,कामेगाव येथील 33/11 केव्ही उपकेंद्र येथे 7 मेगॅवॅट,उपळा(मा.) येथील 33/11 केव्ही उपकेंद्र येथे 5 मेगॅवॅट तर कसबे तडवळे येथील 33/11 केव्ही उपकेंद्र येथे 5 मेगॅवॅट सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले असून येडशी येथील 33/11 केव्ही उपकेंद्र येथे 4 मेगॅवॅट तर जागजी येथील 33/11 केव्ही उपकेंद्र येथे 5 मेगॅवॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहे अशी माहिती तेर येथील विज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता अमरनाथ स्वामी यांनी दिली.

 
Top