कळंब (प्रतिनिधी)- येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या आट्यापाट्या संघाने जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत उत्तुंग यश संपादन केले आहे. या विजयी संघातील 11 खेळाडूंची आता विभागस्तरीय आट्यापाट्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
नुकत्याच कळंब येथील क्रीडा संकुल येथे जिल्हास्तरीय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत मोहेकर महाविद्यालयाच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक मिळविला. विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड समर्थ सोनाजी झाडके,ऋषिकेश बिभीषण डोंगरे,ओम बालासाहेब शिंदे,अभिषेक दत्तात्रय भागुडे,सागर बाळासाहेब जाधव,मुजाहीद अकबर तांबोळी,अजिंक्य दत्तात्रय पवार,प्रथमेश मनोज अंधारे,अभिनव लक्ष्मण मोरे,यश राजू साळुंखे,शुभम संजय जाधवर या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या या देदीप्यमान यशाबद्दल ज्ञानप्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत भगवान, उपप्राचार्य प्रा. जयवंत भोसले, उपप्राचार्य डॉ. के. डी. जाधव, तसेच प्रा. विलास अडसूळ यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. तसेच महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा. सरस्वती वायभसे, सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी निवड झालेल्या खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
