धाराशिव (प्रतिनिधी)- येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामधे *तेरणा ट्रस्टचे विश्वस्त आणि “मित्रा“चे उपाध्यक्ष आणि तुळजापूर विधानसभेचे विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.*यावेळी महत्वाचे म्हणजे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. विद्यार्थी आणि स्टाफ यांनी उस्फूर्तपणे रक्तदान केले. यावेळी विविध स्पर्धेमध्ये नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले . प्रत्येक वाढदिवसाला वृक्षारोपण करण्याची प्रथा असलेल्या महाविद्यालयाने यावेळी सुद्धा महाविद्यालयाच्या आवारामध्ये वृक्षारोपण केले. तर काही पूर्वी लावलेल्या वृक्षांचा आढावा घेण्यात आला. तसेच याच वाढदिवसाचे औचित्य साधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या “एम पावर “ या मंथली जर्नलचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तेरणा ट्रस्टतर्फे चालविल्या जाणाऱ्या “तेरणा स्टडी सेंटर“ येथील विद्यार्थ्यांना वह्या वाटपही करण्यात आले .
या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी तेरणा ट्रस्टचे विश्वस्त बाळासाहेब वाघ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विक्रमसिंह माने, डॉ. डी. डी. दाते, डॉ. प्रशांत कोल्हे, डॉ.उषा वडणे, डॉ.प्रीती माने, प्रा.सुजाता गायकवाड, प्रा. शितल पवार, प्रा.पी एम.पवार, प्रा ज्ञानराज निंबाळकर, यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सर्वप्रथम वाढदिवसानिमित्त केक कापून अभिष्टचिंतन करण्यात आले आमदार राणादादांच्या कार्याविषयी अनेकांनी यावेळी आपल्या भावना बोलून दाखवल्या. कार्यक्रमाच्या शेवटी समता कॉलनीतील स्त्री रुग्णालयातील सर्व महिला रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. या सर्व कार्यक्रमांमध्ये कर्मचारी व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
