धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाडा जनता विकास परिषदेची छत्रपती संभाजीनगर येथे दि. 14/09/2025 रोजी स्वामी रामानंद तिर्थ सभागृह नागेश्वरवाडी छत्रपती संभाजीनगर येथे संस्थेची सर्वसाधारण सभा संपन्न झाली. या झालेल्या सर्वसाधारण सभेत मराठवाडा जनता विकास परिषदेच्या केंद्रीय अध्यक्ष पदी महाराष्ट्रातील प्रसिध्द विचारवंत प्रा. डॉ. सोमनाथ रोडे यांची बहुमताने निवड करण्यात आली. याच सर्वसाधारण सभेमध्ये केंद्रीय सचिव पदी प्रा. अर्जुन जाधव यांची निवड करण्यात आली. कोषाध्यक्ष पदी अशोक सिध्देवाड यांची निवड करण्यात आली. यावेळी व्यंकटेश काबदे माजी अध्यक्ष, जीवन देसाई माजी सचिव तसेच मराठवाडयातील आठ जिल्हयातून संस्थेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. धाराशिव येथून संघटनेचे अध्यक्ष सुरेश शेळके, भाऊसाहेब शिनगारे, प्रा. धनंजय लोंढे, डी.एम. पाटील, अमोल घोगरे, विजय गायकवाड, सागर जाधव, सुभाष चव्हाण उपस्थित होते. या निवडीबद्दल धाराशिव शाखेच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.