तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील सीआरपीएफ मध्ये कार्यरत असलेले जवान बाळासाहेब राऊत यांचे जम्मू काश्मीर राज्यातील अमरनाथ येथे हदयविकाराने निधन झाल्याने शासकीय इंतमानात अंत्यविधी 16 ऑगस्टला करण्यात आला.
धाराशिव तालुक्यातील तेर येथील बाळासाहेब लालासाहेब राऊत (वय 56) हे सीआरपीएफ मध्ये जवान म्हणून कार्यरत होते.त्यांना 15 ऑगस्टला जम्मू काश्मीर येथील अमरनाथ येथे -हदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे प्रेत 16 ऑगष्टला तेर येथे निवासस्थानी आणण्यात आले.नंतर तेर येथे शासकीय इंतमानात अंत्यविधी करण्यात आला.बाळासाहे राऊत यांच्या निधनाचे वृत्त तेर येथे समजताच सर्वत्र शोककळा पसरली.अंत्यविधिच्या वेळी तेर येथील व्यापारी यांनी दुकाने बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली.आमदार राणाजगजितसिंह पाटील, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, शासनाच्या वतीने तहसीलदार डॉ.मृणाल जाधव,ढोकी पोलिस स्टेशनचे सपोनि विलास हजारे,तेरच्या सरपंच दीदी काळे, पोलिस पाटील फातेमा मनियार यांनी श्रद्धांजली वाहिली.अंत्यविधीच्या वेळी प्रचंड मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.बाळासाहेब राऊत यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.