नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथे 6 जुलै रोजी मोहरम सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इस्लामी कॅलेंडर नुसार 1 ते 5 मोहरम दरम्यान बडे बारे इमाम, छोटे बारे इमाम, इमाम कासीम, अब्बास अली, हुंडे नालसाब, नाले हैदर, आली असगर, मौला अली, हुसेन बादशाह या पंज्यां (सवाऱ्यांसह) एकूण 10 ठिकाणी प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर मोहरमच्या 6 ते 9 तारखे दरम्यान प्रथेनुसार दररोज काही पंजे (सवाऱ्या) प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या ठिकाणाहून उचलून पुन्हा त्याच जागेवर बसविण्यात आले.
नळदुर्ग येथे मोहरम निमित्त कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये 6 जुलै रोजी अर्थात मोहरमच्या 10 दिवशी सर्वप्रथम दुपारी 2 वाजता ऐतिहासिक किल्ल्यातील सरकारी पंजे(सवाऱ्या) असलेल्या बडे बारे इमाम व छोटे बारे इमाम यांना जागेवरून उठून बाहेर आणण्यात आले. त्यानंतर इमाम खासिम, अब्बास अली, नाले हैदर,हुंडे नाल साब, अली असगर, हुसेन बादशाह हे पंजे प्रतिष्ठान करण्यात आलेल्या जागेवरून उठविल्यानंतर बडे बारे इमाम व छोटे बारे इमाम यांच्या 14 चकरा पूर्ण झाल्यानंतर सर्व सवाऱ्या किल्ला गेट येथील हजरत सय्यद सादिक शाह वली चौक येथे एकत्रित येऊन एकमेकाची गळा भेट घेतल्यानंतर मोहरमच्या मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाली. हि मिरवणूक पोलीस ठाण्यासमोर मिसरी गंज चौक, क्रांती चौक, चावडी चौक, हजरत सय्यद बुरहानोद्दीन शाह वली रहे. दर्गाह, शास्त्री चौक, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, बस स्टँड, हजरत हबीबुल्ला हुसेनी चौक, मार्गाने निघून नानीमॉ दर्गाहच्या पाठीमागे असलेल्या कर्बला मैदान मध्ये पंजे (सवाऱ्या) चे विसर्जन करण्यात आले.यावेळी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन यादव सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके, आनंद कांगूने पोलीस उपनिरीक्षक संतोष गीते, जिविशाचे अमर जाधव,बालाजी शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल खलील शेख, हसन शेख यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.10 दिवस चालणाऱ्या मोहरम सणानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी मैनोद्दीन शेख, नुरोद्दीन शेख, मैनोद्दीन सय्यद, खमरोद्दीन शेख, नदीम शेख, अफसर शेख, शहाबोद्दीन शेख, जैनोद्दीन शेख, रहेमान कुरेशी, कौसर शेख, सलाउद्दीन शेख, अजहर शेख, इसाक गाताडे, निजाम शेख, अबुबकर शेख,इलाही बागवान,शाहेद कुरेशी, तौफिक कुरेशी,गौस कुरेशी, वसीम कुरेशी, सलीम सय्यद,जब्बार कुरेशी, राजू शहा,अजीत सय्यद ,सज्जाद सावकार, शमशोद्दीन शेख,सय्यद शेख, सलीम शेख, अन्वर शेख, इस्माईल शहा,सुलतान शेख, महेबूब सय्यद, इकबाल शाह, फारुक शहा, युसुफ शेख, निखिल शहा,महेबूब गाताडे,खालेद इनामदार,दानिश शेख यांनी परिश्रम घेतले. यौमे अशुरा च्या निमित्ताने यादे हुसेन म्हणून शहरातील विविध भागांमध्ये शरबत वाटप करण्यात आले तसेच शहरातील मस्जिदी मध्ये नमाज पठण करण्यात आली.तसेच हजरत इमामे हसन रहेमतुल्लाह अलैह व हजरत इमामे हुसेन रहेमतुल्लाह अलैह यांच्यासह शोहदा ए करबला साठी विशेष प्रार्थना करण्यात आली.