धाराशिव (प्रतिनिधी)-  झुंजार सेनानी, महाराष्ट्राचे माजी विरोधी पक्ष नेते, भाई उद्धवराव ( दादा ) पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त शैक्षणिक संस्था, विविध सामाजिक घटक, राजकीय पक्ष, व्यक्ती, सामाजिक संस्था यांचे वतीने पुष्पांजली वाहत विनम्र अभिवादन करण्यात आले.

शनिवारी सकाळी छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रम प्रसंगी राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती शशिकलाताई घोगरे, कार्याध्यक्ष एम. डी. देशमुख, उपाध्यक्ष ॲड. अविनाशराव देशमुख, सचिव भाई धनंजय पाटील, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, मुख्याध्यापक बाळासाहेब मुंडे, उपमुख्याध्यापक विक्रमसिंह देशमुख, आदर्श प्राथमिक विद्या मंदिरचे मुख्याध्यापक कचरू घोडके, पर्यवेक्षक अमोल दीक्षित, सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा जगदाळे, प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, माजी मुख्याध्यापक, गावातील प्रतिष्ठित नागरिक  यांनी प्रांगणातील भाई उद्धवराव पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहत अभिवादन केले.

झुंजार सेनानी भाई उद्धवराव पाटील यांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेत सध्याच्या पिढीने समाजातील वंचित घटकांना न्याय देण्यासाठी व आपले जीवन आदर्शवत जगण्यासाठी निष्ठेने व प्रामाणिकपणे कार्य केले पाहिजे. भाई उद्धवराव पाटील यांचे विचारावर चालणारी ही शाळा व विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य आपल्याला लाभ त्याचे विचार यावेळी मुख्याध्यापक बाळासाहेब मुंडे यांनी बोलताना व्यक्त केले. तर मुख्यमंत्रीपदावर लाथ मारत पक्ष निष्ठा व तत्वनिष्ठ  राजकारण जपण्याचे कार्य करणारे भाई उद्धवराव पाटील आजच्या तरुण पिढीचे मार्गदर्शक आहेत असे बोलताना व्याख्याते विनय देशमुख यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद वीर यांनी केले. सदर कार्यक्रमास प्रशालेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्षा श्रीमती शशिकलाताई घोगरे, कार्याध्यक्ष एम. डी. देशमुख, उपाध्यक्ष ॲड. अविनाशराव देशमुख, सुरेखा जगदाळे यांनी भाई उद्धवराव पाटील यांचा जीवन परिचय व तत्वांविषयी आपले विचार सांगितले.


 
Top