उमरगा (प्रतिनिधी)- येथील कॅप्टनज्ञजोशी स्मारक विद्यालयातील 29 विद्यार्थ्यांना मळमळ ,ताप उलट्या झाल्याने येणेगूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून 25 विद्यार्थ्यांना उपचार करण्यात आले तर चार विद्यार्थ्यांनींना उलट्या व मळमळ वाढल्याने त्या चौघींवर उमरगा उप जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. त्या चारही विद्यार्थ्यांनींची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिक्षिका डॉ. कोमल जाधव (गरड) यांनी सांगितले.
घटनेची शाळेतील पाणी पडल्यामुळे हा त्रास जाणवल्याने बाधीत विद्यार्थ्यांनी वैद्यकीय अधिकार्यांना सांगितले. माहीती मिळताच तालुक आरोग्य अधिकारी डॉ. उमाकांत बिराजदार, गट शिक्षण अधिकारी अमोल राजपूत, डॉ. लक्ष्मण कुंडले व त्यांच्या चमून शाळेला भेट देवून अन्न पाणी , पाण्याच्या टाक्या, सिंटेक टाकी अस्वच्छतेची ठिकाणांची पाहणी करून आवश्यक त्या सुचना केल्या व काळजी घेण्याच्या दक्षते संबंधी लेखी स्वरूपात पत्रही दिले. ग्रा. पं. सदस्य संतोष कलशेट्टी यांनी सदर घटनेची व्हीडिओ क्लिप व माहिती सोशल मिडीयावर व्हायरल केल्यानंतर शाळेकडे पालकांची रिघ लागली. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उमाकांत बिराजदार, डॉ. लक्ष्मण कुंडले, गट शिक्षण अधिकारी अमोल राजपूत, केंद्र प्रमुख अब्दुल कादर कोकळगांवे व त्यांच्या चमूने तीन तास शाळेचा कोपरानंकोपरा , अन्न शिजवण्याचे कक्ष, इमारती वरील अडगळ आदीची बारकाईने पाहणी करून खबरदारीच्या सुचना केल्या . डॉ बिराजदार यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयी घ्यावयाचे प्रात्यक्षिक ही करवून घेतले. संस्थेचे अध्यक्ष तथा पर्यवेक्षक देवराज बिराजदार यांना विद्यार्थ्यांना पिण्यासाठी साधे विंधन विहीरीचे पाणी न देता फिल्टरचे पाणी देण्याच्या सक्त सुचना केल्या.
शांतेश्वर स्वामी- माझी मुलगी श्रेयासाठी धावत शाळेत आलो. शालेय प्रशासनाने फिल्टरचे पाणी दिले असते तर हा प्रकार घडला नसता...
इस्माईल मुल्ला- माझी इदिनाला मळमळ उलट्या झाल्याने धावतच शाळेत आलो. मुलगी सुखरुप असल्याचे पाहील्यावर जीव भांड्यात पडला. शाळेने विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी.
महाबूब तय्यब जमादार- माझी मुलगी अल्पीया शाळेतून घरी न आल्याचे पाहील्यावर शाळेत आले. मुलीला काही त्रास न झाल्याचे पाहील्यावर जीवाची धाकधूक गेली. शाळेने सर्व विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी.
मुख्याध्यापक महेश हरके- घटना घडल्यानंतर विद्यार्थ्यांनींना त्वरीत आरोग्य केन्द्रात दाखल केले. जास्तीचा त्रास असणाऱ्या मुलींना उमरगा उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. आरोग्य अधिकारी व गट शिक्षण अधिकार्यांच्या सूचनेनुसार बदल करणार..
देवराज बिराजदार अध्यक्ष तथा पर्यवेक्षक- अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून सर्व विद्यार्थ्यांची काळजी घेत असल्यानचे सांगितले.
संतोष कलशेट्टी ग्रा. पं. सदस्य- पाण्याच्या स्टीलच्या टाक्या अस्वच्छ आहेत. विंधन विहीरिचे पाणी शुध्दीकरण न करता दिल्याने हा प्रकार निष्काळजीपणाचा असल्याचे सांगितले.
दरम्यान उमरगा रुग्णालयात दाखल असलेल्या प्रांजली कारभारी, सन्मती बिराजदार, प्राजक्ता देवकर व अमीरा भालके यांची विचारपूस करण्यासाठी सरपंच रेखा गुंजोटे,माजी ग्रा. पं. सदस शरण बिराजदार, आप्पा गुंजोटे आदीनी भेट देवून रूग्णांना धीर दिला. व वैद्यकीय अधिकार्यांशी योग्य उपचार करण्यासाठीची चर्चा केली.
या शाळेत 5वी ते 12वी पर्यंत चे वर्ग असून एकूण 590 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पिण्याचे शुद्ध पाण्याची (आर ओ) सोय नसल्याने हा प्रकार घडल्याचे दिसून आले. अधिकाऱ्यांनी शिजवलेले अन्न व टाकीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले असून अन्न व औषध प्रशासनाकडे तपासणीसाठी पाठवत असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमाकांत बिराजदार व गट शिक्षण अधिकारी अमोल राजपूत यांनी सांगितले.
विशेष म्हणजे या अधिकाऱ्यांसह डॉ. लक्ष्मण कुंडले, अनिता बनसोडे, एल. बी. थोरात, सुजीत जगताप, पी पी पाटील, आकाश चव्हाण, अमोल जोशी, विठ्ठल फुलमाला आदी सह इतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या तपासण्या केल्या.