धाराशिव (प्रतिनिधी)-  साहित्य संमेलन म्हणजे साहित्यिकांच्या लेखणीसाठी मिळालेली एक ऊर्जा असते. तसेच ते समाजासाठी सुद्धा टॉनिकचे काम करत असते. असे मत अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती धाराशिव तर्फे कवी कालिदास दिनानिमित्त आयोजित 'मेघदूत कविसंमेलनात कविसंमेलन अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी व्यक्त केले. 

वडगाव येथील श्रीक्षेत्र सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरातील निसर्गरम्य वातावरणात हे कवी संमेलन पार पडले. प्रमुख अतिथी म्हणून देवगिरी प्रांत मंत्री युवराज नळे, साहित्य भारतीचे जिल्हाध्यक्ष भागवत घेवारे, ज्येष्ठ कवी राजेंद्र अत्रे, कार्यवाह रवींद्र शिंदे उपाध्यक्ष कविता पुदाले, डॉ संजय सोनटक्के यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कवी संमेलनात वेगवेगळ्या विषयांवर केलेल्या काव्याचं बहारदारपणे सादरीकरण झालं. शंकर खामकर यांनी नुकत्याच झालेल्या पहलगाम हल्ला प्रकरणावर अतिरेक्यांच्या गोळीबाराने आयुष्य उद्ध्वस्त झालं हे शीर्षक असलेली कविता सादर केली आणि उपस्थितांमध्ये एक प्रकारची भावनिकता निर्माण झाली.  तसेच बाळासाहेब मगर, सुरभी भोजने, अरुण कांबळे, ॲड जयश्री तेरकर, ज्येष्ठ कवी भागवत घेवारे, युवराज नळे, ज्येष्ठ कवी राजेंद्र अत्रे, मनिषा पोतदार, अविनाश मुंडे, अश्रुबा कोठावळे, कृष्णा साळूंके, चंदन सुर्यवशी, बालकवी सत्येंद्र चक्के, यांनी काव्य सादर करून टाळ्यांची दाद मिळवली. मेघदूत कवी संमेलनाचा समारोप संमेलनाचे अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी केला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माधुरी घोडके नळदुर्ग यांनी केले. सूत्रसंचालनाचे देखील सर्वांनी मनसोक्तपणे कौतुक केले आणि सर्वांचे आभार सुरभी भोजने यांनी मानले.

 
Top