धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाने नुकताच जनसुरक्षा कायदा मंजूर केला आहे. या कायद्यामधील तरतुदी लोकशाही प्रणालीच्या विरोधात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्याची व नागरी हक्कांची पायमल्ली होणार आहे. काँग्रेस पक्षाची भूमिका या कायद्याच्या विरोधातील आहे.

या जनविरोधी कायद्या विरोधात जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने विधेयकाची होळी आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच सदरील विधेयक तात्काळ रद्द करण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल यांना निवेदन देऊन निषेध नोंदवण्यात येणार आहे. हे आंदोलन शुक्रवार दिनांक 18 जुलै रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी, स्थानिक स्वराज संस्थाचे माजी पदाधिकारी, शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेस, सर्व फ्रंटल, सेलचे प्रमुख, काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन काँग्रेस कमिटीचे धाराशिव जिल्हाध्यक्ष ॲड धिरज आप्पासाहेब पाटील यांनी केले आहे.

 
Top