येडशी (प्रतिनिधी)- हिंदू कुटुंबाकडून मुस्लिम धर्मियांचा पवित्र मोहरम सण साजरा करण्याची मागील तीन वर्षांपासूनची परंपरा भिकार सारोळा येथे सुरू आहे. गावातील जगदे कुटुंबात चौथी पिढी यंदा मोहरम सण साजरा करून अखंडितपणे धार्मिक एकात्मतेचा आदर्श घालून देत आले आहे.

भिकार सारोळा गावात मोहरम सण कोणीच साजरा करत नसल्याने गावातील माधव जगदे प्रत्येक वर्षी मोहरम सणाला आवर्जून बाहेर गावी जायचे. यातूनच त्यांची मोहरम सणावर श्रद्धा बसली. मोहरम सणात चंद्राची कोर असलेली नाल (नालसाहेब) मिळाली. तेंव्हापासून ते आजतागायत गावातच मोहरमचा सण मोठ्या उत्साहात साजरा करू लागले. जगदे कुटुंबात सलग दोन दिवस मोहरम सण साजरा करण्यात येतो. यानिमित्त 6 जुलै रोजी रात्री सवारी मिरवणूक काढण्यात आली. 7 जुलै रोजी दिवसभर धार्मिक कार्यक्रम व रात्री 7 ते 10 पर्यंत संपूर्ण गावात सवारी मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी आण्णा जगदे, बापू जगदे, सुधाकर जगदे, जनक जगदे, नितीन जगदे, बापू कोळी, गणेश जगदे, अच्युत मोरे, गणेश तनमोर, बंडू माने, विजय मेदने, आण्णा माने, पप्पू माने, गणेश मोरे, योगेश जगदे, पांडूरंग विश्वासे, सचिन जगदे, मैनुद्दीन शेख, महेबुब शेख, अमीन शेख, भैय्या तनमोर, नागनाथ मेदने, सुरेश मेदने, दशरथ मेदने, अभिषेक पाटील यांच्यासह उत्सव पार पाडण्यासाठी गावातील हिंदू-मुस्लिम बांधव यांनी परिश्रम घेतले.

 
Top