भूम (प्रतिनिधी)-  येथील प्राईड इंग्लिश स्कूलच्या वतीने ग्रीन डे च्या निमित्ताने दिनांक 21 जुलै रोजी कन्हेरी घाटात वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात शिक्षक, विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

हिरवाईने नटलेल्या कन्हेरी घाट हा बालाघाट डोंगर रांगाचा महाबळेश्वर आहे. “एक विद्यार्थी एक वृक्ष“ या संकल्पनेतून प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःच्या हाताने झाडे लावली.  तत्पूर्वी प्राईडच्या प्रांगणात ग्रीन डे निमित्त विद्यार्थ्यांनी हिरव्या रंगाचे कपडे परिधान केले होते. तसेच हिरव्या रंगाचे विविध खेळणी, पालेभाजी व वेगवेगळे पदार्थ बनवून आणले होते. वृक्षारोपणाच्या या कार्यक्रमात पर्यावरणाचे महत्त्व, जंगलाचे संवर्धन आणि प्रदूषणमुक्त भविष्यासाठी झाडांचे महत्त्व या विषयी विद्यार्थ्यांनी ‌‘सेव्ह ट्रीज', ‌‘गो ग्रीन' अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण प्रेम आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. ग्रीन डे साजरा करताना निसर्गाच्या सान्निध्यात वृक्षारोपण हा उपक्रम एक स्मरणीय आणि प्रेरणादायी क्षण ठरला.  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  शिक्षिका मेघा सुपेकर, दिपीका टकले व भाग्यश्री डांगे यांच्यासह सेविका अरुणा बोत्रे व आशा म्हेत्रे यांनी परिश्रम घेतले.

 
Top