तुळजापूर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ट नेते शरद पवारांना संधी असताना, त्यांच्या हाती सर्व काही असताना, ओबीसी आरक्षणातला मराठ्यांचा हक्क डावलून त्यांनी भटके विमुक्त आणि ओबिसिंचे भले केले. आमच्या हक्काचे 16% आरक्षण ओबीसींना दिले. 23 मार्च 1994 रोजीच्या जी आर वरून मी स्वतः त्यांना जाबही विचारला आहे. धनगर समाजाला तर शिवाजीबापू शेंडगे यांच्या एका निवेदनावर पवारांनी वेगळा प्रवर्ग करून दिला. हे हाके सारखा विद्वान विसरला असेल. पण तो समाज विसरणार नाही. त्यामुळे पवारांवर जातीय वादाचा शिक्का मारने योग्य नाही असे मला वाटते.
सारथी आणि महाज्योतीचा तुलनेचा विषय. हे हाके जेंव्हा कुठेच नव्हते तेंव्हा सारथी आणि महाज्योतीच्या संशोधक विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन सह्याद्री अतिथी ग्रहात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत बैठक लावली. मी आहे. त्यात दोन्ही बाजूंच्या विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन अतिरिक्त निधी शिंदे साहेबांनी मंजूर करायला लावला. त्यावेळी सुमंत भांगे साहेब सचिव होते. त्यांच्या दालनात देखील ते शिष्टमंडळ घेऊन मी स्वतः गेलो होतो. जवळपास सर्व सचिव दर्जाचे अधिकारी संशोधक विद्यार्थ्यांच्या विरोधात होते, तरी तो निधी मंजूर करून घेतला गेला. हे त्या विद्यार्थ्यांना विचारून घेऊ शकता.
मराठा विरुद्ध ओबीसी असे चित्र महाराष्ट्रात हाके सारखे लोक उभा करत होते. तेंव्हा दोन्ही समाजाच्या विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन जाऊन प्रश्न सोडवण्यात भूमिका निभावलेला मी आहे. आज घडीला सारथी ही एकमेव संस्था आहे, जीचा थेट लाभ गरीब मराठा विद्यार्थ्यांना होतो. जेवढा सारथीला निधी असतो जवळपास तेवढा निधी महाज्योतीला देखील मिळतोच. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ सारखे त्यांचेही महामंडळे आहेत. पण त्यातील दहा पाच कोटी इकडे तिकडे झाले की यांना अन्याय झाल्या सारखं वाटतं.
अहो आज ओबीसी साठी वेगळे मंत्रालय आहे. त्याची बजेटरी तरतूद हजारो कोटींमध्ये असते. आम्ही मराठ्यांनी कधीच त्याची तुलना केली नाही. किंवा त्यांना मिळते आम्हाला का नाही? असला हावरे पणाही दाखवला नाही. उलट यापुढे मराठ्यांनी त्यांच्या संख्येच्या तुलनेत निधी मिळावा यासाठी जनांदोलन उभे करावे असे माझे मत आहे. शासनात जर ओबीसी साठी मंत्रालय आहे, तर मंत्रालय देखील असावे. असे आता मला वाटत आहे.