धाराशिव (प्रतिनिधी)-प्रशालेने प्राथमिक व माध्यमिक पूर्व शिष्यवर्ती परीक्षेत ' न भूतो न भविष्यति ' असा इतिहास रचत 40 शिष्यवृत्तीधारक व राज्याच्या गुणवत्ता यादीत तीन विदयार्थ्याने स्थान पटकावले . त्यामध्ये कु .आदिती काळे, कु . अवनी अर्जुने , समर्थ पवार या तिघांनी घवघवीत यश संपादन केले त्यामुळे
या देदिप्यमान यशाबद्दल संस्थेच्या वतीने भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम मान्यवरांच्या हस्ते गुरुवर्य के .टी . पाटील सरांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून समारोहास सुरुवात झाली. नंतर मान्यवरांचा सत्कार संस्थेमार्फत करण्यात आला त्यानंतर स्कॉलरशिप व स्पर्धा प्रमुख कुमार निकम यांनी प्रास्तविकात वर्षभरात घेतलेल्या विविध उपक्रमाबाबत माहिती सर्वांना दिली . त्यानंतर पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्तीधारक असलेले
विदयार्थी आदिती काळे , अवनी अर्जुने , समर्थ पवार , समृद्धी देशमुख, आदित्य कांबळे , सानवी कदम , प्रार्थना गोडसे , स्वानंदी माने , श्रावणी सुरडे, अविष्कार हुल सुलकर , आदिती गायकवाड , अनन्या कांचनबटवे , मुस्कान शेख , सोनाक्षी शिंदे , प्रथमेश बाराते , प्रवीण थोरबोले , रणवीर लोमटे , यशश्री निंबाळकर ,वेदिका भोसले , निशांत साठे , शौर्य बोबडे , भक्ती तांबे , कृष्णा सोमवंशी , सोमेश देशमुख , तृप्ती सोनटक्के , चैतन्य पाटील , नक्षत्रा जावळ, ओम रुद्रके या 28 शिष्यवृत्तीधारकांचा व तर पाचवीमधून शिष्यवृत्तीधारक सुरज काकडे , समर्थ जावळे, प्रेमदेव खोगरे , आयुष निकम , सोमनाथ काकडे , विराज जाधव , आराध्या भंडारे , शौर्य मोहिते , शौर्य टकले , तनुष्का जाधव , ऐश्वर्या यादव , सृष्टी जगदाळे यांचा मान्यवरांच्या हस्ते फेटा बांधून सन्मानचिन्ह , भेटवस्तू देऊन त्यांना सत्कारित करण्यात आले .
तर यांना मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक अध्यापक शरद क्षीरसागर , काकासाहेब शिंदे , सुभाष संकपाळ, अजित माने, अंबादास माढे, अक्षय बोपलकर, रामेश्वर बोबडे , धम्मपाल ओव्हाळ, सचिन चव्हाण, श्रीमती जे.बी .शिंदे, ए.एस. देशमुख, के.ए. यादव, एम .पी . वाघमारे, लिपीक गणपत उपासे ,नेताजी मुळे व स्कॉलरशिप विभागप्रमुख कुमार निकम यांचाही सत्कार आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे व या समारोहाचे अध्यक्ष सुधीर पाटील , प्रमुख पाहुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था , धाराशिवचे प्राचार्य डॉ . दयानंद जटनुरे , जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे , धाराशिव जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष देविदास पाठक , संस्थेच्या सचिव
प्रेमाताई पाटील , मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, संस्था सदस्य संतोष कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी साहेबराव देशमुख ,प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पर्यवेक्षक यशवंत इंगळे, सुनील कोरडे ,राजेंद्र जाधव, बालाजी गोरे, श्रीमती बी.बी. गुंड,डॉ. विनोद आंबेवाडीकर यांनी सत्कारीत केले .
प्राचार्य दयानंद जटनुरे यांनी धाराशिव जिल्हयाची शैक्षणिक ओळख ही भोसले हायस्कूल अशी बनली आहे तर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी भोसले हायस्कूल पॅटर्न म्हणून महाराष्ट्रात निर्माण करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक आपल्या भाषणात केले तर समारोपीय अध्यक्षीय भाषणात सुधीर पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यातील विकासात संस्थेच्या योगदान कशाप्रकारे सुरु आहे.याबाबत मत व्यक्त केले. शेवटी सर्वांचे आभार प्राचार्य नंदकुमार नन्नवरे यांनी मानले तर सूत्रसंचालन सूर्यकांत पाटील यांनी केले.