भूम (प्रतिनिधी)- जेजला, आंबी, पाटसांगवी या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधील रस्ता करावा या मागणीसाठी विठ्ठल सुरवसे हे उपोषण करत आहेत. यांच्या समर्थनार्थ तुळजापूर-नगर महामार्गावर नळी वडगाव फाटा येथे जेजला ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

जेजला, आंबी,पाटसांगवी हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा दोन अंतर्गत मंजूर असलेला अंतरवली सरहद्द जेजला, आंबी, पाटसांगवी रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यासाठी सुरू करण्यासाठी सुरवसे यांचे उपोषण सुरू आहे. उपोषणाचा दुसरा दिवस असताना त्यांची तब्येत अत्यंत खालावली. शासनाने कोणत्याही प्रकारचे दखल न घेतल्याने जेजला ग्रामस्थांनी नगर तुळजापूर महामार्ग एक ते दीड तास रास्ता रोको करण्यात आला. यावेळी महामार्गावर वाहनांच्या लांब लांब रांगा लागल्या होत्या. जेजला गावामध्ये सुरवसे यांच्यासह अकरा ग्रामस्थ अद्यापही आमरण उपोषण करत आहे करत आहेत. जोपर्यंत प्रशासनाची यंत्रसामग्री येऊन रस्त्याचे काम चालू करत नाहीत. तोपर्यंत ग्रामस्थ उपोषणावर ठाम आहेत. यावेळी ग्रामस्थ रस्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top