भूम (प्रतिनिधी)- साहिल सेवाभावी संस्थेच्यावतीने दि. 10 जुलै रोजी येथील साहील कार्यालयात गुरुपौणिमेनिमित्त माजी नगराध्यक्ष संजय गाढवे व जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य संयोगिता गाढवे यांच्या हस्ते गुरुजनांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी गाढवे म्हणाले, सर्व गुरुवर्यांचा आशीर्वाद घेऊन इथपर्यंत आलो. स्वतःला भाग्यवान समजतो की, माझे गुरुवर्य अजूनही मला माझ्या डोक्यावर सदैव आशीर्वादाचा हात ठेवत आले. जीवनामध्ये आई-वडील व गुरूंचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. यावेळी त्रिंबक गाढवे, सुंदरराव हुंबे, उषा विधे, अरुण शाळू, गुरुलिंग होनराव, आंबादास वरवडे, केशव जगदाळे, किरण जाधव, आलीम शेख, नामदेव शेडगे, गुरुदास नाईकवाडी, के एन थोरात, विनायक मस्के, महावीर भोपलकर, भैरट गुरुजी, सूरज गाढवे, किरण जाधव, सुनील थोरात, साहिल गाढवे, रामभाऊ बागडे, मुशिर शेख यांच्यासह आदी उपस्थित होते. कार्याक्रमाचे प्रास्ताविक संयोगिता गाढवे यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय गाढवे यांनी मानले.

 
Top