तुळजापूर (प्रतिनिधी)-  येथील पंचरंग प्रतिष्ठाण या नाट्य संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय  एकांकिका लेखन स्पर्धाचा  निकाल संस्थेचे अध्यक्ष  श्रीकांत नाडापुडे आणि इतर ज्येष्ठ मान्यवराच्या वतीने घोषित करण्यात आला. या स्पर्धेमध्ये प्राप्त झालेल्या सर्व 31 संहितेतून  लेखनशैली, प्रयोगशीलता, रंगमंचीय आकृतीबंध, नाट्यावकाश आणि प्रसृत होणारा संदेश या आणि अशा अनेकविध तंत्रांचा अनुबंध लक्षात घेऊन गुणानुक्रमे पारितोषिक विजेत्या एकांकिका  घोषित करण्यात आल्या आहेत. 

 यामध्ये प्रथम पारितोषिक- स्व.पांडुरंग नन्नवरे यांच्या स्मरणार्थ नारायण नन्नवरे यांच्याकडून 15 हजार रूपये रोख रक्कम आणि पंचरंग करंडक फक्त 73 झाडांसाठी लेखक संजय लाड यांना देण्यात आला. तर द्वितीय पारितोषिक रितेश राजेश शिंदे, हॉटेल शिंदे कॉर्नर यांच्या कडून 11 हजार रूपये रोख रक्कम आणि पंचरंग करंडक “पॉज “ लेखक डॉ. अनघा राजपूत अंबाजोगाई यांना देण्यात आला. तर तृतीय पारितोषिक स्व. लक्ष्मी आणि नारायण रोचकरी यांच्या स्मरणार्थ अनिल रोचकरी यांच्या कडून 7000/रु रोख आणि पंचरंग करंडक हे लपंडाव लेखक सुशील स्वामी यांना देण्यात आला.  उत्तेजनार्थ पारितोषिक स्व. संजय घोडके यांच्या स्मरणार्थ संभाजी भोसले यांच्या कडून 5 हजार रूपये रोख आणि पंचरंग करंडक एकांकिका इ आय 8085 लेखक अमेय जाधव विरार,मुंबई यांना देण्यात आला. उत्तेजनार्थ पारितोषिक  स्व.ग्यानबा जेटीथोर  यांच्या स्मरणार्थ श्री शिवाजी जेटिथोर यांच्या कडून 5 हजार रूपये रोख आणि पंचरंग करंडक एकांकिका नथिंग इज फेअर- लेखक राजीव मुळये सातारा यांना देण्यात आला. 

तसेच या स्पर्धेत विजेत्या 5 एकांकिका संहितेचे पुस्तक काढण्यात येणार आहे.  

या निकाल घोषणा कार्यक्रमास पंचरंग प्रतिष्ठानचे  प्रकाश हुंडेकरी, संतोष शामराज, प्रा. संभाजी भोसले, राजेश शिंदे, अनिल रोचकरी,शिवाजी बोधले, शशिकांत कऱ्हाडे,प्रा. डॉ. शिवाजी जेटीथोर, प्रशांत शेटे, सुहास साखरे, गोपाळ देशमुख यांची उपस्थिती होती. 


 
Top