धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाडा जनता विकास परिषद जिल्हा शाखा धाराशिवची बैठक संघटनेचे कार्यालयात प्रा. अर्जुन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. गेल्या अनेक दशकापासून संघटना मराठवाडयाच्या विकास प्रश्नावर लोकशाहीच्या माध्यमातून कार्य करत आहे. यावेळी संघटनेची जिल्हयाची नुतन कार्यकारणीची निवड करण्यात आली.
अध्यक्ष सुरेश शेळके, उपाध्यक्ष महेश पोतदार, सचिव विजय गायकवाड, कोषाध्यक्ष सागर जाधव, जिल्हा कार्यकारणी सदस्य धनंजय पाटील, धर्मवीर कदम, प्रा. अर्जुन जाधव, डी.एम. पाटील, नवनाथ पवार, सुभाष चव्हाण, श्रीहरी लोखंडे, प्रा. धनंजय लोंढे, युनुस पटेल, अमोल घोगरे, ॲड. चैतन्य वीर. संघटनेच्या धाराशिव तालुकाध्यक्ष पदी शामराव लावंड, कळंब तालुकाध्यक्ष पदी दिपक बारकुल, तुळजापूर तालुकाध्यक्ष पदी प्रा. धनंजय लोंढे यांची निवड करण्यात आली. बैठकीत संघटनेच्या केंद्रीय कार्यकारणीवर धाराशिव जिल्हा कार्यकारणीतून प्रा. अर्जुन जाधव व कामगार नेते डी.एम. पाटील यांची निवड करण्यात आली.