तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर येथील तुळजापूर विकास प्राधिकरणांत अंतर्गत करण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या ड्रेनेज लाईन चेंबर झाकण कामांची पोलखोल आता होवु लागली आहे. सध्या शहरातील ड्रेनेज लाईन तुंबणे व ड्रेनेज लाईन चेंबर फुटणे हे नित्याचेच बनले आहे. याचा ञास भाविकांना सहन करावा लागत आहेत. माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतुन 315 कोटीचा विकास आराखडा राबवला गेला. भाविकांना मुलभूत सुविधा मोफत मिळाव्यात हा उद्देश होता. माञ हा उद्देश साध्य झाला का हा शोधाचा विषय आहे. आजही तिर्थक्षेञ तुळजापूरला येणाऱ्या भाविकांना साध्या मुलभूत सुविधा विकत घ्याव्या लागतात हे वास्तव्य सत्य आहे. तुळजापूर विकास प्राधिकरणात करण्यात आलेली कामे निकृष्ट दर्जाचे नियमानुसार झाले नसल्याचा आरोप शहरवासियांमधुन केला जात आहे. पण याची चौकशी ना कारवाई, इतर विकास कामांचा चौकशा व त्यात बाबतीत कारवाई विकास कामा बाबतीत चौकशीत कारवाई दुजाभाव का असा सवाल आज उपस्थितीत केला जात आहे.विशेष म्हणजे घाटशिळ रोड भागात गेल्या दोन महिन्यांपासून रस्त्यावर असलेल्या चेंबरची दुरवस्था झाल्याने रोज किमान आठ ते दहा वाहने त्यामध्ये अडकत आहेत. त्यामुळे वाहनांचे नुकसान तर होतेच, शिवाय भाविकांच्या वेळेची व सुरक्षिततेचीही मोठी हानी होत आहे. या भागात वाहन अडकल्याच्या अनेक घटना दररोज घडत असून, भविष्यात एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चेंबर झाकण दर्जा बाबतीत साशंकता !
तिर्थक्षेञ तुळजापूर शहरात ड्रेनेज लाईनवर टाकण्यात आलेल्या चेंबर झाकण दर्जा बाबतीत सांशकता व्यक्त केली जात आहेत. कारण विविध भागातील ड्रेनेज लाईन चेंबर झाकण सतत फुटत असल्याने याचा दर्जा बाबतीत सांशकता व्यक्त होते.