धाराशिव (प्रतिनिधी)-  येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्रीपतराव भोसले हायस्कूलने सालाबादाप्रमाणे याही वर्षी देदिप्यमान कामगिरी बजावत यशाची परंपरा कायम राखत उज्ज्वल यश प्राप्त केले आहे. प्रशालेचा 97.17 टक्के निकाल लागला असून दोन विद्यार्थाना 100 % गुण प्राप्त झाले.

महाराष्ट्रातील सर्वात मोठी विद्यार्थी संख्या असलेली मराठी माध्यमाची शाळा म्हणून ओळख असलेल्या या प्रशालेत इयत्ता दहावीला 1026 विदयार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 997 विदयार्थी उत्तीर्ण झाले. शेकडा 90% पेक्षा अधिक गुण घेणारे तब्बल 173 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी केला.  या सत्कार प्रसंगी संस्थाध्यक्ष सुधीर पाटील यांनी आता लातूर किंवा पुण्यासारखे शहरात पुढील शिक्षणाला जाण्याऐवजी धाराशिव येथेच फिजिक्सवाला या कोचिंग क्लासच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण उपलब्ध केले असून आपण नवीन धाराशिव पॅटर्न तयार करुन आपल्या शहराचे नाव देशपातळीवर नेऊ असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

यावेळी संस्थेच्या सरचिटणीस प्रेमा सुधीर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पर्यवेक्षक यशवंत इंगळे, गुणवत्ता सुधार समितीचे प्रमुख मनोज भुसे तसेच सर्व पदाधिकारी, पालक व विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.

 
Top