मुरूम (प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाने शहरातील सर्व जनतेला एकत्रित येण्याचे आवाहन करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुरुवारी दि. 8 मे रोजी भारतीय लष्कराने विशेष अभियान सिंदूर राबवून पाकिस्तानातील दहशत वादयांचा खात्मा केल्याबद्दल फटाके फोडून, पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला. या वेळी भारतीय जनता पक्षाचे व्यापार आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत (राजू) मिनियार, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र बेंडकाळे, माजी सैनिक दडगू चव्हाण, शिवाजी पवार, देविदास व्हनाळे, माने, मासूलदार टेकाळे, किसान ब्रिगेड जिल्हाध्यक्ष भगत माळी,, युवक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहन जाधव, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष सिद्धलिंग हिरेमठ, युवा मोर्चा धाराशिव जिल्हासचिव आकाश क्षीरसागर, बाळासाहेब गिरीबा, राजीव शिंदे, बाबुराव बेगमपुरे सह शहरातील विविध संस्था, संघटनेचे पदाधिकारी बहुसंख्य उपस्थित होते.