धाराशिव (प्रतिनिधी)- शहरतील समता नगर येथे कलाविष्कार प्रस्तुत मेलडी स्टार्स हौशी छंदी गायकाच्या समूहाच्या वतीने 'ऑपरेशन सिंदूर' भारतीय सैन्य दलाच्या यशस्वितेस सलामी म्हणून देशभक्तीपर गीतांचे सादरणीकरण करण्यात आले. प्रथम समुहासाठी नवीन साऊंड सिस्टीमचे मुख्य प्रवर्तक युवराज नळे, समन्वयक शरद वडगावकर, सह सन्मवयक मल्हारी माने, रविंद्र कुलकर्णी, वर्षा नळे यांच्याहस्ते पुजन करण्यात आले. त्यानंतर पहेलगाम भ्याड हल्लात शहीद भारतीय नागरिक व जवांनांना श्रद्धांजली अर्पित करुन देशभक्तीपर गीत गायन रविंद्र कुलकर्णी, शेषनाथ वाघ,शरद वडगावकर, मल्हारी माने, महेश उंबर्गीकर, ध्रुपद ढेकळे, मुकुंद राजेनिंबाळकर, सुजीत अंबुरे, नितीन बनसोडे, अनिल मालखरे, धनंजय कुलकर्णी, राजाभाऊ कारंडे, सुशील कुलकर्णी, विद्युलता दलभंजन, तारा मोरे, बबिता ढेकळे, प्रगती कुलकर्णी, यांनी देशभक्तीपर गीत गायन केले. राष्ट्र गीतांने कार्यक्रमाची सांगाता करण्यात आली.