तुळजापूर (प्रतिनिधी)-  सोलापूर येथील रहिवासी असलेले रामकृष्ण शिवयोगी देवनगांव हे आपल्या संपूर्ण कुटुंबासह आज सकाळी श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे आले होते. दर्शनाच्या वेळी त्यांनी श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी 55 ग्रॅम म्हणजेच साडेपाच तोळे सोने श्रद्धेने श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी अर्पण केले.

अर्पण केलेल्या मध्ये एक सोन्याचा नेकलेस हार (46.720 ग्रॅम) व एक सोन्याचा साधा हार (9.080 ग्रॅम) असे एकूण 55.80 ग्रॅम सोने देवनगांव कुटुंबीयांनी श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी अर्पण केले. देवनगांव कुटुंब हे निस्सीम श्री तुळजाभवानी देवीचे भक्त असून ते नियमितपणे देवीच्या दर्शनासाठी येत असतात.


 
Top