धाराशिव (प्रतिनिधी)- अहिल्यादेवी होळकर यांचे व्यक्तीमत्व अष्टपैलू होते. त्यांनी गोरगरीब जनतेसाठी लढा दिला. त्यामुळे अशा महापुरूषांच्या जयंती साजरी करण्याने काम करण्यास आपल्याला प्रेरणा मिळते. असे प्रतिपादन भाजपाचे आमदार तथा मित्राचे उपाध्यक्ष राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.

अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त धाराशिव शहरातील अहिल्यादेवी होळकर चौकात आमदार राणाजगजितसिंह पाटील बोलत होते. पुढे बोलताना आमदार पाटील यांनी अहिल्यादेवी होळकर यांनी केले कार्य अनुकरणीय असून, कार्यकर्ते नेत्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा असे सांगितले. आमदार पाटील, ॲड. मिलिंद पाटील, इंद्रजित देवकते, भारत डोलारे, अमित शिंदे, दत्ता बंडगर, लिंबराज डुकरे, सोमनाथ लांडगे, दत्ता सोनटक्के, बालाजी वगरे, संतोष वतने,श्रीकांत तेरकर, शाम तेरकर आदींनी होलकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. 


काँग्रेस व शिवसेनेची उपस्थिती

शनिवार दि. 31 मे रोजी अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त शिवसेनेचे आमदार कैलास पाटील, रवि वाघमारे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, माजी नगराध्यक्ष विश्वास शिंदे, खलील सय्यद सर, उमेश राजेनिंबाळकर, प्रशांत पाटील, अग्निवेश शिंदे आदींनी होळकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. 

 
Top