भूम (प्रतिनिधी)- देशामध्ये हुकूमशाही आणि दंडमशाहीच्या जोरावर राजकारण चालू आहे अशातच आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये राजकारणाच्या जोरावर स्वतः अमाप संपत्ती कमवून धन दांडगे झाले असून  जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या हाताला काम नाही सुशिक्षित बेकारी वाढवून सर्वसामान्य जनता देशोधडीला लावली आहे. आत्ता सध्या सर्व सामान्य जनता राजकारणी लोकांना ओळखून आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये घराणेशाहीचे राजकारण चालू आहे. सर्वसामान्यांचे हित जोपासायचे असेल तर पुन्हा एकदा घराणेशाही संपवून आपली सेवा करण्याची संधी मला द्यावी, असे आवाहन महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर यांनी यांनी केले आहे.

भूम तालुक्यातील माणकेश्वर, सुकटा या ठिकाणी दि. 18 रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुढे बोलताना म्हणाले की, आमचे विरोधक मला विकासाच्या बाबतीत केवीलवाना प्रश्न विचारतात मी सर्वसामान्यांच्या हिताचे धाराशिव जिल्ह्यातील शासकीय धाराशिव मेडिकल कॉलेज उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना चालू केले. तसेच लातूर पुणे इंटरसिटी रेल्वे चालू केली. सोलापूर धाराशिव रेल्वे मार्गाला मान्यता आणि सध्या असलेल्या रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण आणि विद्युतीकर पूर्णत्वास नेले. हायवे चांगले व्हावे आणि सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड हायवेतील शेतकऱ्यांना मोबदला मिळावा यासाठी संसदेत आवाज उठवला. मराठा लिंगायत आरक्षणावर संसदेत वारंवार आवाज उठवला.लोकांच्या संपर्कात राहून लोकांना आत्मविश्वास मिळवून दिला. विमा दुष्काळ यावर संसदेत बोलून ती मदत जनतेला मिळवून दिली. मराठा आरक्षणावर फडवणीसाची बाजू न घेता मराठ्यांच्या बाजूने उभे राहिले. असे अनेक समाज उपयोगी कार्य केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून व आपल्या सहकार्यातून मी आज सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेलो आहे हे त्यांना पाहवत नाही माझा संपर्क तरुणांपासून लहानापासून ते वृद्धापर्यंत थेट फोन व्दारे संपर्क झाला आहे आणि चालु आहे मला विश्वास आहे निश्चित पणे केलेल्या कामाची पावती जनता येणाऱ्या निवडणुकीत 7 मे ला मशाल चिन्हाच्या मतदान रुपी आशिर्वाद मला मिळतील असा विश्वास ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी माजी आमदार राहुल मोटे, सहसंपर्कप्रमुख शंकरराव बोरकर, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, राष्ट्रवादीचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील, उपजिल्हा प्रमूख डॉ चेतन बोराडे, कांग्रेसचे विलास जी.शाळू, जिल्हा प्रमुख रणजीत पाटील, समन्वयक दिलीप शाळू महाराज,जीनत सय्यद,तालुका प्रमुख मेघराज दादा पाटील,हनुमंत पाटूले, शिवसेना भूम तालुका प्रमुख श्रीनिवास जाधवर, विधानसभा प्रमुख प्रल्हाद आडागळे  संजय आण्णा पाटील आरसोलीकर, उद्योजक शंकर नागरगोजे, प्रविण खटाळ,उमा ताई रणदिवे,आर डी सूळ,शहरप्रमुख प्रकाश अकरे,सभापती बाजार समिती सुरेश मालक जैन, अण्णासाहेब वणवे पाटील,युवा सेना तालुका प्रमुख सुधीर ढगे 'शिवसेनेचे भगवान बांगर,रवि कोरे आळणीकर,शिवयोगी चपणे, शिवप्रताप कोळी,ॲड विनायक नाईकवाडी, आबासाहेब मस्कर , दिपक मुळे  संघटक अजित तांबे पाटील,विहंग कदम, उपतालुका प्रमुख श्रीमंत भडके, आदिनाथ पालके, अनिल अंधारे, विश्वास काका सराफ,धोपारे मामा यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक कार्यकर्ते महिला भगिनी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 
Top