तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यात तीन दिवसात विजेच्या गडगडाट, वादळवारे सह  40.9 मिमि अवकाळी पाऊस पडला आहे. यात शनिवारी पडलेल्या पावसामुळे 88 गावे बाधीत झाले आहेत. यात 618 शेतकऱ्याच्या शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात  104.5 हेक्टर बागायत क्षेत्राचे नुकसान झाले असुन 289.4 हेक्टर क्षेत्रातील फळबागांचे असे एकुण 393.9 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. हे झाले शेती क्षेञाचे तसेच शेतकऱ्यांचे महावितरणचे यात प्रचंड नुकसान झाले आहे. तुळजापूर तालुक्यात 1 एप्रिल ते 21 एप्रिल पर्यत 64 मिमि इतका पाऊस झाला आहे.  शेतीचे नुकसान शासन अजेंड्यावर आले आहे. 


21 जनावरे दगावली 58 घरे पडले

तुळजापूर तालुक्यात विजेच्या गडगडाट व  वादळवाऱ्या सह झालेल्या अवकाळी पावसात 21 जनावरे दगावली असुन 58 कच्या घरांची पडझड झाली आहे. फळबाग सह अन्य नुकसानीचा सर्वे चालु असल्याची माहीती तहसिलदार अरविंद बोळंगे यांनी दिली. महसुल कृषी सह अनेक कर्मचारी निवडणुक कामात असून, तरीही ज्या गावात नुकसान झाल्याची तक्रार आली आहे त्यांचा नुकसान पंचनामे करण्यासाठी महसुल कृषी विभागातील कर्मचारी पाठवले आहे. महसुल व कृषी विभाग पंचनाम्यासाठी शेत शिवारात दाखल झाला आहे.


 
Top