धाराशिव  (प्रतिनिधी)- येत्या 7 मे रोजी होणाऱ्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत 22 एप्रिल रोजी नामांकन अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 4 उमेदवारांनी निवडणूकीतून माघार घेतल्याने निवडणूकीच्या रिंगणात आता 31 उमेदवार आहेत. या 31 उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले. 

ज्या 4 उमेदवारांनी 22 एप्रिल रोजी निवडणूकीतून माघार घेतली, यामध्ये आमदार विक्रम काळे, बाळकृष्ण शिंदे, रहिमोद्दीन काझी व अरुण जाधवर यांचा समावेश आहे.

निवडणूकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये सौ.अर्चना राणाजगजितसिंह पाटील पक्ष  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (चिन्ह-घड्याळ), ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर पक्ष-शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे (चिन्ह-मशाल), संजयकुमार भागवत वाघमारे, पक्ष-बहुजन समाज पार्टी (चिन्ह-हत्ती), आर्यनराजे किसनराव शिंदे, पक्ष-राष्ट्रीय समाज दल (आर) (चिन्ह-अंगठी), भाऊसाहेब रावसाहेब आंधळकर, पक्ष-वंचित बहुजन आघाडी (चिन्ह-प्रेशर कुकर), ॲड.विश्वजीत विजयकुमार शिंदे पक्ष-आदर्श संग्राम पार्टी (चिन्ह-बॅट), नेताजी नागनाथ गोरे, नवनाथ विश्वनाथ दुधाळ, नितेश शिवाजी पवार, शामराव हरीभाऊ पवार, शेख नौशाद इकबाल, सिध्दीक इब्राहीम बौडीवाले उर्फ गोलाभाई, ज्ञानेश्वर नागनाथराव कोळी, अर्जुन (दादा) सलगर, उमाजी पांडूरंग गायकवाड, काका फुलचंद कांबळे, काकासाहेब संदिपान खोत, गोवर्धन सुब्राव निंबाळकर, नवनाथ दशरथ उपळेकर, नितीन नागनाथ गायकवाड, ॲड.भाऊसाहेब अनिल बेलुरे, नितीन खंडू भोरे, मनोहर आनंदराव पाटील, योगीराज आनंता तांबे, राजकुमार साहेबराव पाटील, राम हनुमंत शेंडगे, विलास भागवत घाडगे, शायनी नवनाथ जाधव, समीरसिंह रमेशचंद्र साळवी, सोमनाथ नानासाहेब कांबळे व हनुमंत लक्ष्मण बोंदर या उमेदवारांचा समावेश आहे.


 
Top