उस्मानाबाद /प्रतिनिधी -

कुशल अभियंत्याची अभियांत्रिकी क्षेत्रातील सद्या वाढती मागणी असून ,  दर वर्षीप्रमाणे ह्यावर्षी  सुद्धा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाची कॅंपस ईंटरव्ह्यू साठी नामांकित कंपन्यानी निवड केली आहे. आहे.  

टीसीएस, टेकमहिंद्रा ,हिरो मोटार, मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा, आय.बी.एम.,टीसीएस, टेकमहिंद्रा , आयडीबीआय ,बोनामी सॉफ्टवेअर, सोलार स्क्वेअर, किर्लोस्कर , मर्सिडीज बेंज ,अमूराज , ईमिकाॅन  क्रेव्ह ईन्फोटेक ,एसकेएफ अशा नामांकित  कंपनीमध्ये उस्मानाबाद येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे नजीकच्या काळातील विद्यार्थी कार्यरत आहेत. 

भरतीपूर्व प्रशिक्षण, ट्रेनिंग ,सॉफ्ट स्किल, ऑनलाइन सर्टिफिकेशन तसेच नोकरी संदर्भात आवश्यक सर्व ट्रेनिंग वेळेत पूर्ण केल्यामुळे मागील वर्षा प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा भरपूर जॉब मुलांना मिळतील असा विश्वास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी व्यक्त केला. मुलांना मिळणारे चांगल्या पगाराचे वार्षिक वेतन पाहून पालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे 

दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षीसुध्दा पुणे   येथील राधे इंजिनीरिंग अँड सर्विसेस या नामांकित कंपनीचा कॅम्पस भरती प्रोग्रॅम दिनांक ३ ऑक्टोबर रोजी झाला . शेवटच्या वर्षाच्या मेकॅनिकल विभागाच्या  तब्बल ५० मुलांनी सहभाग नोंदवला होता .राधे इंजिनीरिंग अँड सर्विसेस हि कंपनी  जागतिक उत्पादन उद्योगासाठी अभियांत्रिकी सेवा आउटसोर्सिंग आणि उत्पादन विकास आयटी  सेवांमध्ये जागतिक अग्रणी आहे; महत्वाकांक्षी उत्पादन कंपन्यांना अधिक चांगली उत्पादने डिझाइन आणि तयार करण्यास मदत  करते . राधे इंजिनिअरिंग सर्व्हिसेस अँड सोल्युशन्सचे मुख्यालय पिंपरी चिंचवड, औद्योगिक क्षेत्र पुणे येथे आहे. हि कंपनी CAD/CAM/CAE व आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेवांमध्ये काम करत आहे . पुण्यातील चाकण औद्योगिक परिसरात उत्पादन केंद्र आहे.कंपनीचे डायरेक्टर श्री. सचिन वाळके ह्यांनी मुलांच्या मुलाखती घेतल्या . या भरती मोहिमेत कंपनीने चार विद्यार्थ्यांची निवड केली. कु. अवंती माने ,  सौरभ लोहार , ओंकार सरफळे, इम्रान मिर्झा , या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली . मुलाखतीचे आयोजन टीपीओ प्रा. अशोक जगताप  आणि  प्रा. दंडनाईक  यांनी केले . विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे  अध्यक्ष डॉ. पदमसिंह पाटील साहेब , आ. राणाजगजितसिह पाटील  साहेब, विश्वस्त श्री. मल्हार पाटील साहेब,सर्व‌ विश्वस्त, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने आणि सर्व विभागप्रमुख  यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.भरती मोहिमेबद्दल 2023 च्या बॅचची ही फक्त सुरुवात आहे. नजीकच्या भविष्यात कॉलेजने तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अधिकाधिक भरती मोहिमेची व्यवस्था केली आहे असाही मनोदय प्राचार्य डॉ.माने यांनी यावेळी बोलून दाखविला.

 
Top