उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  इंदिरा गांधी पुण्यतिथी व राष्ट्रीय संकल्प दिवस आणि वल्लभभाई पटेल जयंती व राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले आणि राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेण्यात आली.

 यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, नायब तहसीलदार पंकज मंदाडे, अर्चना मैंदर्गी तसेच कार्यालयातील विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 
Top