उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातंर्गत जिल्ह्यातील समुदाय आधारित संस्था आणि संस्थात्मक खरेदीदार यांच्याकडून विविध पिकांच्या मुल्यसाखळी विकासाची उत्पादक भागीदारी उपप्रकल्पासाठी ३१ ऑक्टोंबर २०२२ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

 या प्रकल्पातंर्गत जिल्ह्यात यापुर्वी ३२ समूदाय आधारित संस्थाना राज्यस्तरावरुन जिल्ह्यासाठी लक्षांक देण्यात आलेला होता त्यानुसार एकुण २४ समूदाय आधारित संस्थाना प्राथमिक मान्यता प्राप्त झालेली असुन उर्वरित ८ प्रकल्पांना मंजुरीसाठी जिल्ह्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज सादर करण्यासाठी पात्र समुदाय आधारीत संस्थामध्ये आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियांनातगर्त स्थापित प्रभाग संघ, महिला आर्थिक विकास महामंडळव्दारे स्थापित लोकसंचित साधन केंद्र यांचा समावेश आहे. प्राप्त होणाऱ्या अर्जांपैकी पात्र स्पर्धात्मक व उत्कृष्ट अर्जांना प्रकल्पाचे ६० टक्यापर्यंत अनुदान देण्यात येईल. अर्ज हे ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने स्विकारण्यात येईल. अर्ज सादर करण्यासाठी नोंदणी प्रमाणपत्र, २५० सभासद नोंदणी यादी, लेखा परिक्षण अहवाल, खरेदीदारा समवेतचा करारनामा इत्यादी कागदपत्रे आवश्यक असुन अर्जाचा नमुना आदि माहितीसाठी https:smart.mh.org या संकेतस्थळावर तसेच प्रकल्प संचालक कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) उस्मानाबाद कार्यालयात उपलब्ध आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी कार्यालयात संपर्क साधावा, असे अवाहन प्रकल्प संचालक (आत्मा) उस्मानाबाद यांनी केले आहे.


 
Top