उस्मानाबाद / प्रतिनिधी-

बावी ते खामसवाडी या रस्त्यावार11 जानेवारी 2022 रोजी एक अनोळखी व्यक्ती आजारी अवस्थेत सापडल्यानतंर त्यास उपचारसाठी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 13 जानेवारी-2022 रोजी 09:30 वा उपचारादरम्यान या व्यक्तीचे निधन झाले आहे.

उस्मानाबाद येथील ग्रामीण पोलीस स्टेशन येथे याबाबत आक्समिक मृत्यु नं.04/2022 कलम 147 सी आर पी सी दाखल आहे. अनोळखी मयत पुरुषाचे वय अंदाजे 48 वर्षे आहे ,या अनोळखी व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. प्रेताचे वर्णन पुढील प्रमाणे आहे. रंग :- काळा, शरीर बांधा मजबुत, उंची – 5 फुट 4 इंच, डोक्याचे आणि दाढीचे केस काळे आणि लांब, उजव्या डोळ्याजवळ जुन्या जखमेचा वर्ण अंगावर फुल र्शट दोन पांढऱ्या रंगाचा निळे रेषा असलेला, दुसरा फिकट पिवळा शर्ट त्यावर काळे ठिपके, दुसऱ्या शर्टवर टेलर मार्क US COTTON XL CLIM पॅट राखाडी रंगाची आहे. तरी या अनोळखी व्यक्तीची उपयुक्त माहिती प्राप्त झाल्यास ग्रामीण पोलीस ठाणे येथे कळवावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.


 
Top