तुळजापूर /प्रतिनिधी-

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत नगर परिषद तुळजापूर मार्फत प्रस्तावित असलेल्या 4.9 कोटीच्या  विकास कामाचा शुभारंभ माजी मंत्री तथा तुळजापूर तालुक्याचे विद्यमान आमदार  रणाजगजीतसिंग मोहिते पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.

तसेच उस्मानाबाद रोड ते मायक्रोस्टेशन काँक्रीट नाली करणे,रस्त्याच्या बाजूस पेव्हर ब्लॉक करणे, मोतीझरा रोडवर वसाहतीमध्ये अंतर्गत रस्ते करणे, नाली करणे कामांचा शुभारंभ करण्यात आला .त्यावेळी जिल्हा परिषद उस्मानाबाद अध्यक्ष  अस्मिताताई कांबळे  नगराध्यक्ष श्री सचिन भैय्या रोचकरी, युवा नेते  विनोद पिटूभैय्या गंगणे,प्रभागाचे नगरसेवक  चंद्रकांत  कणे, नगरसेवक  पंडितराव जगदाळे, नगरसेवक विजय आबा कंदले, नगरसेवक किशोर साठे, औदुंबर कदम, नागेश नाईक,  नाना लोंढे, श्रीअभिजित कदम, नगर अभियंता  अशोक सनगले,अभियंता  अविनाश काटकर  व नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.

 
Top