उस्मानाबाद / प्रतिनिधी-
जिल्ह्यामध्ये आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये १३ जणाना कोरोनाची लागन झाली आहे. तर दोघांचा मृत्यु झाला आहे. (ता.२५) रोजी जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून २५६ स्वॅब नमुने तपासणी साठी स्वामी. रामानंद तीर्थ शासकीय  वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेंद्र उस्मानाबाद येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी २०१ अहवाल रात्री उशिरा प्राप्त झाले असून त्याचा अहवाल तसेच जिल्ह्याबाहेरील १ पॉझिटिव्ह रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. जिल्हयात बरे झालेले रूग्ण ४१४ तर उपचार घेत असलेले रूग्ण १९५ आहेत त्यामुळे जिल्हयात एकुण रूग्ण ६४६ झाली आहे. आतापर्यंत ३७ जणांचा बळी गेला आहे.
पॉझिटिव्ह १३ रुग्णामध्ये उस्मानाबाद चार, उमरगा तीन, तुळजापूर पाच, कळंब येथील एकजणाचा समावेश आहे. उस्मानाबाद  तालुक्यातील ३५ वर्षीय पुरूष, जिल्हा रुग्णालय क्वार्टर, उस्मानाबाद, ५५ वर्षीय पुरुष, रा. प्रसाद कॉलनी उस्मानाबाद, ५४ वर्षीय पुरुष रा.आगड गल्ली उस्मानाबाद, ५० वर्षीय स्त्री, रा.देशपांडे स्टॅन्ड, उस्मानाबाद.
उमरगा तालुक्यातील ४० वर्षीय पुरूष, भीम नगर, उमरगा, २२ वर्षीय पुरुष, रा. गुंजोटी ता. उमरगा, ५८ वर्षीय पुरुष, रा. गुंजोटी ता. उमरगा यांचा समावेश आहे. तुळजापूरमधील ३० वर्षीय स्त्री, रा. नळदुर्ग ता. तुळजापूर, २७ वर्षीय पुरुष, रा. अणदूर ता. तुळजापूर, ५६ वर्षीय पुरुष, रा.अणदूर ता. तुळजापूर, ३३ वर्षीय पुरुष, रा. मंगरूळ ता. तुळजापूर, ३३ वर्षीय पुरुष, रा. मंगरूळ ता. तुळजापूर यांना लागन झाली आहे. कळंब येथील ४८ वर्षीय स्त्री लोणार गल्ली, बार्शी येथे उपचार घेत आहे.
 दोघांचा मृत्यू 
दोघांचा कोरोनाने मृत्यु झाला आहे. हे दोन्ही रुग्ण उस्मानाबाद शहरातील आहेत. ५८ वर्षीय पुरुष, मिल्ली कॉलनी व ५४ वर्षीय पुरुष, आगड गल्ली यांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
 
Top